Talegaon Dabhade: निवृत्त लष्करी जवान संभाजी कदम यांचे निधन

एमपीसी न्यूज – निवृत्त लष्करी जवान संभाजी प्रल्हाद कदम (वय 76) यांचे आज (बुधवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. मुरलीधर मंडळाचे माजी अध्यक्ष व तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य महेश तथा बापू कदम यांचे ते वडील होत.

संभाजी कदम यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, भाऊ, जावई व नातवंडे असा परिवार आहे संभाजी कदम यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता बनेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.