Talegaon Dabhade : बधलवाडी येथे कृषी अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली भातपीक कापणीचा प्रयोग

एमपीसी न्यूज- नवलाख उंब्रे , बधलवाडी येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जी. पडघडमल यांच्या पर्यवेक्षणाखाली शेतकरी अनिल बधाले व दशरथ बधाले यांच्या भात पिकाची कापणी करण्यात आली. एका गुंठयात सरासरी उत्पादन 73.84 टक्के आले असून चारसूत्री लागवडीमुळे नुकसान कमी झाले आहे, असे बधाले यांनी सांगितले.

जिल्हा कृषी अधिकारी बी. जी. पडघडमल, तालुका कृषी अधिकारी देवेंद्रनाथ ढगे यांनी शेतकरी बंधूंना आवाहन केले की, रब्बी पिकांची पेरणी करतांना उशीरा लागवड करता येणारे वाण निवडावे. हरबरा पेरणीसाठी विजय, दिग्विजय व ज्वारीसाठी फुले चित्रा, फुले माऊली, फुले अनुराधा निवड करावी तसेच लागवड करतांना बी.बी.एफ. ने पेरणी करावी यामुळे उत्पादनात 20-25% वाढ होईल.

यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक एस. बी. मोरे, कृषी अधिकारी पी. एस. पाटील, विमा प्रतिनिधी तुषार जगताप, माजी सरपंच एकनाथ शेटे तसेच शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.