Talegaon Dabhade: संत सावतामाळी महाराज पुण्यतिथी निमित्त नदीकिनारी वृक्षारोपण

Talegaon Dabhade: Riverside tree planting on the occasion of Saint Sawtamali Maharaj's death anniversary सकाळी श्री सावतामाळी महाराज यांच्या मंदिरात मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नदीकिनारी पिंपळ, वड, जांभूळ, भेंडी,चाफा, दुरांडा आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

एमपीसी न्यूज- ‘कर्म हाच देव’ असे मानणाऱ्या श्री संत सावतामाळी महाराज यांची ७२५ वी पुण्यतिथी शेलारवाडी येथील इंद्रायणी नदी तीरावर ‘श्री.संत सावतामाळी तरुण मंडळाच्या’ वतीने वृक्षारोपण करुन साजरी करण्यात आली.

दरवर्षी शेलारवाडी येथे पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येतो. परंतु, यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत हा सोहळा साधेपणाने साजरा करुन वृक्षारोपण करण्यात आले. मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते योगेश माळी व किशोर माळी यांनी मांडली होती.

सकाळी श्री सावतामाळी महाराज यांच्या मंदिरात मुर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नदीकिनारी पिंपळ, वड, जांभूळ, भेंडी,चाफा, दुरांडा आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले.

या कामात लहान मुलांनीही श्रमदान केले. यावेळी लक्ष्मण माळी, नंदकुमार माळी, दत्तात्रय माळी, सुनील माळी उपस्थित होते. या उपक्रमात शेलारवाडी येथील ग्रामस्थांनीही आपला सहभाग नोंदवला.

अमरदेवी मंदिर परिसर सफाई, ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा, इंद्रायणी नदी परिसर स्वच्छता, सामाजिक संस्थांना मदत व वृक्षारोपण आदी विविध उपक्रम राबविणाऱ्या श्री संत सावतामाळी मित्र मंडळाचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.