Talegaon Dabhade : ग्रामदेवता आई जाखमाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन

एमपीसी न्यूज- जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांच्या प्रयत्नातून 15 वर्षापासून प्रलंबित असलेला सांगवी येथील ग्रामदेवता आई जाखमाता मंदिराकडे जाणारा रस्ता तयार होणार आहे. या रस्त्याच्या कामाचे उदघाटन बाबुराव वायकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सांगवी गावच्या प्रथम सरपंच मनिषा लालगुडे, बाळासाहेब खांदवे, नारायण लालगुडे, ज्ञानेश्वर पाटील, बबनराव खांदवे, ज्ञानेश्वर विष्णु खांदवे, बाळासाहेब खांदवे, महादु खांदवे, यशवंत खांदवे, बारकु खांदवे, प्रकाश ओव्हाळ, बबन खांदवे, छबु तोडकर, सुदाम तोडकर, सुनील खांदवे, युवराज तोडकर, दशरथ खांदवे, सुनील दंडेल, उपसरपंच विशाल वहिले, भाऊसाहेब ढोरे, गणेश ढोरे, अक्षय रौंधळ, अनिल खांदवे, गणेश लालगूडे, शाम पवार आदि उपस्थित होते.

वायकर यांनी लालगुडे कुटुंबीयांना व ज्ञानेश्वर पाटील यांना विश्वासात घेऊन जागेची अडचण समजून सांगितली. आप्पांवर विश्वास ठेवून लालगुडे परिवार व पाटील साहेब यांनी रस्ता देण्यासाठी होकार दिला. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न सुटला. सदर रस्त्यासाठी आप्पांनी जिल्हा परिषद फंडातुन १० लाखांचा निधी देण्याचे कबूल केले. रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे नेल्यामुळे सांगवी ग्रामस्थांनी बाबुराव वायकर यांचे गावच्या वतीने आभार मानले. तसेच जागामालक लालगुडे कुटुंबीयांचे व ज्ञानेश्वर पाटील यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.