Talegaon Dabhade : पोलिसांचे पथसंचालनातून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग पाळत तळेगाव शहरात गुरुवारी पथसंचलन करण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी पोलिसांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून नागरिकांनी देखील हे नियम पाळावेत, असे आवाहन केले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठी सतत रस्त्यावर येऊ नये, वाहनबंदी आणि संचारबंदीचे पालन करावे, प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी, सोशल मीडियाचा वापर जपून करावा, असे आवाहनही पोलिसांनी केले.

येथील मारुती मंदिर चौकातून पथसंचलनास सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठ, राजेंद्र चौक, खडक मोहल्ला, गणपती चौक, शाळा चौक, सुभाष चौक, जिजामाता चौक या मार्गावर संचलन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांच्या उपस्थितीत मास्क लावून व ‘सोशल डिस्टन्सिंग’पाळून अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.