Talegaon Dabhade: रोटरी क्लबचा आगळावेगळा उपक्रम, नियमांचे पालन करत गुरु पौर्णिमा साजरी

Talegaon Dabhade: Rotary club City's unique initiative, Perform Guru Pujan to maintaining physical distance 'डॉक्टर डे' निमित्त डॉ. प्रवीण कानडे यांचा 'कोरोना योध्दा' म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने फिजिकल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करत आगळावेगळा गुरू पूजनाचा उपक्रम पार पडला.

गुरूपौर्णिमेनिमित्त रमेश जाधव (गुरूजी) व मंगला काळकर यांच्या निवासस्थानी जाऊन प्रातिनिधिक स्वरूपात या दोन गुरूजनांचा सत्कार ‌रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष रो.संतोष शेळके, सेक्रेटरी रो.दिपक फल्ले, ज्येष्ठ मार्गदर्शक रो.दादासाहेब उ-हे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्याचबरोबर ‘डॉक्टर डे’ निमित्त डॉ. प्रवीण कानडे यांचा ‘कोरोना योध्दा’ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माजी प्राचार्य पंडित पाचकुडवे यांनाही सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.भगवान शिंदे यांनी केले. रमेश जाधव व मंगला काळकर, डॉ. प्रवीण‌ कानडे यांनी मनोगत व्यक्त करत रोटरीच्या सेवाभावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमासाठी प्रकल्प प्रमुख रो.संतोष परदेशी, प्रकल्प प्रमुख रो.डॉ. सौरभ मेहता, अ‍ॅडमिन रो.सुरेश शेंडे, रो.राजू कडलक यांनी विशेष परिश्रम घेतले. रो.दिपक फल्ले व‌ माजी अध्यक्ष रो.मनोज ढमाले यांनीही मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.