Talegaon Dabhade : ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ तळेगांव सिटी’च्या अध्यक्षपदी यशवंत दाभाडे

नूतन संचालक मंडळाचा पद्ग्रहण समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगांव दाभाडे येथे २१ जून रोजी वैशाली मंगल कार्यालयात “रोटरॅक्ट क्लब ऑफ तळेगांव सिटी”चा सन २१०९-२० चा नूतन संचालक मंडळाचा पद्ग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील व सचिव प्रतीक माने यांनी नूतन अध्यक्ष यशवंत दाभाडे आणि सचिव आकाश गाडे-पटील यांच्याकडे आपला पदभार सोपवला.

पद्ग्रहण समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विवेक इनामदार यांच्यासह डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट प्रतिनिधी अक्षय मोरे, रोटरी सिटी अध्यक्ष मनोज ढमाले, ट्रेनर दिलीप पारेख,युथ डायरेक्टर शरयू देवळे आणि डिस्ट्रिक्ट 3131 चे संचालक मंडळ उपस्थित होते.

  • यावेळी सन 2018-19 या वर्षांमध्ये रोटरॅक्ट क्लब तळेगांव सिटीने रोटरॅक्ट क्लब ट्रेनर रो दीपक फल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, धार्मिक इत्यादी क्षेत्रात राबविलेल्या प्रकल्प कार्याचा आढावा अध्यक्ष केशव मोहोळ-पाटील यांनी तर, येत्या वर्षांमध्ये करण्यात येणाऱ्या कार्याचा आढावा नूतन अध्यक्ष यशवंत दाभाडे यांनी आपल्या मनोगतात मांडला.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोटरॅक्ट क्लबच्या स्वप्नपूर्ती या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. रोटरॅक्ट क्लब ट्रेनर दीपक फल्ले, केशव मोहोळ, यशवंत दाभाडे,प्रतीक मेहता, विवेक इनामदार, अक्षय मोरे यांनी आपली आपले विचार मांडले.

  • कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रोटरॅक्ट क्लब ऑफ तळेगांव सिटीचे प्रतीक मेहता, अवधूत साळुंखे, कौस्तूभ केळकर, आकाश लांडे, प्रशांत जाधव, संकेत करणकोट, शिव करणकोट, अक्षता सोनकांबळे, फेमिन शेख, अपूर्वा मांडे, रोशनी ओसवाल आणि सर्व रोटरॅक्ट क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन हर्षद जव्हेरी तर, आभार आकाश गाडे-पाटील यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.