Talegaon Dabhade : अपघातातील मृत दोघांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांचा धनादेश नगराध्यक्षा जगनाडे यांच्या हस्ते सुपूर्द

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने उतरविलेल्या श्री डोळसनाथ महाराज अपघाती विमा सरंक्षण योजने अंतर्गत अपघातामध्ये मृत झालेल्या दोघांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचे धनादेश नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील मतदारयादी नुसार असलेल्या 46 हजार नोंदणीकृत मतदारांचा अपघाती विमा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने उतरविला आहे. या विम्याची भरपाई म्हणून कै. रत्नाकर शेडगे व कै. पांडुरंग भेगडे या अपघातामध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयाचा विम्याचा धनादेश त्यांचे नातेवाईकांकडे देण्यात आला.

या कार्यक्रमास पक्षप्रतोद सुशिल सैंदाणे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, शोभा भेगडे, वैशाली दाभाडे, कल्पना भोपळे, विभावरी दाभाडे, नीता काळोखे, मंगल भेगडे, काजल गटे, संध्या भेगडे, प्राची हेंद्रे, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर विवेक देवकर, विमा प्रतिनिधी, जे. टी. बागुल आदि मान्यवर उपस्थित होते.

हि योजना नगरपरिषदेने 26/10/2018 रोजी सुरु केली होती. तिची मुदत 25/10/2019 रोजी संपली आहे. मुदत संपल्यावर पुढील वर्षाचा विमा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून काढला गेला नाही. त्यामुळे विमा प्रतिनिधी, प्रशासन यावर उपस्थित लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात ताशारे ओढले. यामुळे या कार्यक्रमात काहीकाळ स्तब्धता निर्माण झाली होती.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने उतरविलेल्या श्री डोळसनाथ महाराज अपघाती विमा सरंक्षण या योजनेकामी पञकार मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शन व विशेष प्रयत्न आणि या दुःखदप्रसंगी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल अमित शेडगे यांनी परिवाराच्या वतीने दाभाडे यांचे यावेळी ऋण व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक दिलीप गायकवाड यांनी केले तर, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, वैशाली दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले. तर, अमित शेडगे यांनी ऋण व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.