BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी स्वखर्चातून केले रस्ता दुरुस्तीचे काम

एमपीसी न्यूज- तळेगाव- चाकण- शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तळेगाव येथे या मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम तळेगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी स्वखर्चाने करून नागरिकांची गैरसोय दूर केली आहे.

नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला हे काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार होता म्हणून संग्राम काकडे यांनी तातडीने तळेगाव स्टेशन चौक, शुभम काॅम्प्लेक्स समोरील रस्त्यावरील व इंद्रायणी काॅलनीमधील रस्त्यावरील खड्डे स्वखर्चातून बुजवून घेतले. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून त्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

चाकण तळेगाव हा रस्ता वाहतुकीचे दृष्टीने अत्यंत अरुंद असून या रस्त्यावर अनेकदा मोठमोठे अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. हा रस्ता राज्यमार्ग होता. त्याचे रुंदीकरण त्वरित व्हावे म्हणून केंद्राकडून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित केले. या रुंदीकरणास येणा-या खर्चाला देखील मंजुरी मिळाली आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like