Talegaon Dabhade: मुलींच्या अनाथाश्रमात फ्रिस्ट्म पंप्स कंपनीतर्फे महिला दिन साजरा

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त तळेगावदाभाडे येथील प्रेरणा मुलींच्या अनाथाश्रमात फ्रिस्ट्म पंप्स या कंपनीतर्फे Sanitary Incinerator मशीन देण्यात आले. तसेच मुलींना खाऊ वाटून शुभेच्छा देऊन महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कंपनीचे अधिकारी नवाज मुल्ला, विक्रम कुलकर्णी, तनुजित नंदी, सोनाली इंगोले, मिरा लोखंडे, साक्षी सावंत, अर्चना आव्हाड, किरण चितळे, मारुती सगर, किरण वीर, महेष मुंदिनकेरी, सुभाष तिवारी, संस्थेच्या जाधवताई आणि निलेश भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी कंपनीच्या अधिकार्‍यांनी मुलींना स्वच्छतेचे महत्व पटवून देत  Sanitary Incinerator मशीनचा वापर करण्याचे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.