Talegaon Dabhade : विद्यार्थी चळवळ मोडीत काढणार असाल तर त्या विरोधात संघर्ष करु- संस्कार चव्हाण

एमपीसी न्यूज -पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी लवकरच पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन, विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या जाणून घेऊन संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा भाजपा विद्यार्थी आघाडीचे उपाध्यक्ष संस्कार चव्हाण यांनी आज (रविवारी) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा त्यांनी निषेध केला. तसेच मावळ तालुक्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेसाठी आठवड्यातून एकदा तरी पोलीसांनी भरारी पथकाद्वारे महाविद्यालयात पाहणी करावी व संबंधित रोडरोमियोंवर कारवाई करावी, यासाठी सर्व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देणार आहे.  तसेच खेडेगावातील महाविद्यालयीन मुला-मुलींना बस व रेल्वेच्या पासमध्ये सवलत मिळावी यासाठी एसटी आगार व रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही निवदेन देणार आहे, अशी माहिती पत्रकात दिली आहे.
मावळ तालुक्यात लवकरच तरुण महाविद्यालयीन विद्यार्थींनीसाठी शिक्षण व समुपदेशनाच्या दृष्टिकोनातून ह्या विषयाचे जाहीर व्याख्यान आयोजित करणार असून लवकरच विद्यार्थ्यांचे प्रश्न सरकार समोर मांडण्यासाठी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकातदादा पाटील व जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींची भेट घेणार असल्याचेही चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.