Santosh Dabhade:संतोष दाभाडे यांच्या वाढदिवसानिम्मित शारदाश्रम वसतिगृहातील मुलांना खाऊवाटप व आर्थिक मदत

एमपीसी न्यूज: मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष संतोषदाभाडे यांचा वाढदिवस दि.08 रोजी शिरगाव येथील शारदाश्रम वसतिगृह येथे साजरा करण्यात आला,व वसतिगृहास आर्थिक सहाय्य देण्यात आले. (Santosh Dabhade) शायनल इंटरप्रायझेस चे सर्वेसर्वाे महेश निंबाळकर,विशाल लोखंडे यांच्याकडून वसतिगृहातील मुलांना खाऊवाटप करण्यात आले.

 

दरम्यान संतोष दाभाडे यांच्याकडून वाढदिवसानिमित्त दहा हजार रुपये रक्कम चेक स्वरूपात शारदाश्र येथील मुख्यध्यापक विजय लोखंडे व संचालक मंडळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.वाढदिवस हा हौस मौज करत साजरा करण्याचा दिवस नसून गोर गरिबांच्या आयुष्यात आनंद देण्याचा व अडचणींचा सामना करावा लागतो अश्या लोकांना मदत करण्याचा दिवस असतो’ असे मत संतोष दाभाडे यांनी व्यक्त केले.

Bihar Political Crisis : बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटली!

यावेळी संतोष दाभाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी मा.ता.रा.काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गणेश खांडगे,जेष्ठ पत्रकार संघांचे सुनिल वाळुंज,तळेगाव पोलीस स्टेशन पीएसआय मतकर साहेब, चाकण पोलीस स्टेशन चे पीएसआय झोळ साहेब मा.ता.राष्ट्रवादी सा.न्याय विभाग अध्यक्ष विकि लोखंडे,(Santosh Dabhade) ट्रान्सपोर्ट सेल उपाध्यक्ष विकी नवघणे,उद्योजक महेश भाऊ निंबाळकर, विशाल जी लोखंडे, श्रीकांतजी पालवे,चंद्रकांत पोमण,व सहकारी उपस्थित होते. तसेच वाढदिवस प्रसंगी मा.ता.राष्ट्रवादीकाँग्रेस अध्यक्ष गणेश खांडगे यांनी संतोष दाभाडे यांना शुभेच्छा दिल्या. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लोखंडे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.