BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : सफाई कामगारांचे ‘पाद्यपूजन’ करून संतोष दाभाडे यांनी साजरा केला आपला वाढदिवस

एमपीसी न्यूज- आळंदी- पंढरपूर निर्मल वारीचे प्रमुख संतोष दाभाडे पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील सफाई कामगारांचे ‘पाद्यपूजन’ करून वेगळा आदर्श ठेवला आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, कार्याध्यक्ष रवींद्र आवारे, शिक्षण समिती सभापती कल्पना भोपळे, महिला बालकल्याण समिती सभापती प्राची हेंद्रे, उपसभापती काजल गटे, शोभा भेगडे, माजी नगरसेविका सुरेखा आवारे यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

संतोष दाभाडे यांनी तळेगाव शहरात रोज साफसफाई कारणा-या कर्मचा-यांपैकी पाच कर्मचा-यांना सभागृहातील खुर्चीवर बसवून त्यांचे पाय धुवून टॉवेलने पुसले, हळदी कुंकू लावून डोके टेकवून त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

या सोहळ्यामध्ये निर्मल वारीमध्ये काम केलेल्या कार्यकर्त्यांचा आणि गड किल्ले रक्षक यांचा सन्मान राज्यमंत्री बाळा भेगडे व सहका-याच्या हस्ते करण्यात आला. सफाई कामगारांचा पाद्यपूजनाचा अनोखा कार्यक्रम प्रथमच या परिसरात घेतल्याने संतोष दाभाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement