Talegaon Dabhade : सरस्वती विद्यामंदिरचा तुषार घोरपडे शालांत परीक्षेत मावळात प्रथम

एमपीसी न्यूज- माध्यमिक शालांत परीक्षेत सरस्वती विद्या मंदिरचे 109 पैकी 105 विद्यार्थी पास झाले. शाळेचा एकूण निकाल 96.33 % लागला.
तुषार नितीन घोरपडे हा विद्यार्थी 95.60 % गुण मिळवून शाळेत व मावळ तालुक्यात प्रथम आला. वरद चंद्रकांत माने 93.20 % गुण मिळवून शाळेत दुसरा आला तर अश्लेषा शिवलिंग तोडकर, ऋतुजा दिलिप चिले, स्नेहा विवेक इनामदार ह्या तीनही विद्यार्थिनी 91.20 % गुण मिळवून शाळेत तिसऱ्या आल्या.

गणित व विज्ञान विषयाचा निकाल 100% लागला. सात विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले. 44 विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये तर 32 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. तुषार घोरपडे, वरद माने, अश्लेषा तोडकर, यांना संस्कृतमध्ये 99 तर तुषार घोरपडे, वरद माने यांना गणितात 99 गुण मिळाले. यश येवले याने 90.80% व मिहीर पावसकर याने 90.40 % गुण प्राप्त केले.

सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद देशक, सदस्य अनंत भोपळे, डॉ. ज्योती चोळकर, विश्वास देशपांडे व मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.