Talegaon Dabhade : सरस्वती विद्या मंदिरमध्ये स्वीप अंतर्गत मतदान जागृती

एमपीसी न्यूज- सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विभागात विधानसभा निवडणूक 2019 साठी स्वीप अंतर्गत मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम घेण्यात आले.

मतदान जागृती या विषयावर इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांची प्रचार फेरी, मानवी साखळी, पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. पालकांनी मतदान करावे यासाठी पालकांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले. मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी सर्व स्पर्धा उत्तम रीतीने पार पाडल्या. नई तालीम अंतर्गत गणेश उंडे यांनी विद्यार्थ्यांना स्क्रू ड्राइवर, पाना..इत्यादी इलेक्ट्रिक साहित्याची माहिती सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.