Talegaon Dabhade : परिवहन समितीमध्ये पालकांनी जाणून घेतले आरटीओ कायद्याचे महत्व

सरस्वती विद्या मंदिरमध्ये परिवहन समिती सभा

एमपीसी न्यूज- वाहनचालकाने आपल्या गाडीची काळजी कशाप्रकारे घ्यावी, लहान मुलांच्या हातात गाडी दिल्यानंतर झालेल्या अपघातात पालकांना होणारी शिक्षा, शालेय मुलांची वाहतूक करण्यासाठी शासनाचे नियम याबद्दलची माहिती तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये झालेल्या परिवहन समिती सभेत देण्यात आली.

सरस्वती विद्या मंदिरमध्ये मुख्याध्यापिका रेखा परदेशी व परिवहन समिती प्रमुख संजय गायकवाड यांनी सोमवारी (दि. 25) या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी गावडे, आरटीओचे सदस्य अनिल रावण, सरस्वती शिक्षण संस्थेच्या सदस्या डॉ . ज्योती चोळकर, मयुरेश मुळे, प्राथमिक विभागाच्या शिक्षिका शोभा जाधव, गाडी वाहतूक प्रमुख मावळे, पालक, गाडीवाले काका उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी केले. त्यांनी शालेय मुलांची वाहतूक करताना शासनाने कोणते नियम ठरवून दिले आहेत या बद्दल माहिती सांगितली. परिवहन समिती वाहतूक प्रमुख मावळे यांनी प्रत्येक वाहन चालकाने आपल्या गाडीची कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत माहिती सांगितली.

प्रशासन अधिकारी गावडे म्हणाले, ” पालकांनी आपली मुले विश्वासाने वाहन चालकांवर सोपवलेली असतात त्याला तडा जाता कामा नये. पालकांनी देखील आपल्या लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये”

अनिल रावण यांनी लायसन्स संदर्भात व लहान मुलांनी गाडी चालविल्यास पालकांना होणाऱ्या शिक्षेसंदर्भात माहिती दिली. पालकांच्या प्रश्नांना उपस्थितांनी उत्तरे देऊन शंकानिरसन केले. सूत्रसंचालन संजय गायकवाड यांनी तर आभार संस्थेच्या सदस्य डॉ. ज्योती चोळकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.