Talegaon Dabhade : सरस्वती विद्या मंदिरमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- दरवर्षी 15 ऑक्टोबर हा माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्तान अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विभागात ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्था सदस्य सुचित्रा चौधरी, डॉ. ज्योती चोळकर, श्रीमती अनुराधा तापीकर यांनी छान प्रतिसाद दिला.
त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांबरोबर सर्व माध्यमिक शिक्षकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका रेखा परदेशी, गणेश देशपांडे, अरुंधती देशमाने यांनी केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.