Talegaon Dabhade : डाॅ. शं. वा.परांजपे स्मृती बालनाट्य स्पर्धेत सरस्वती विद्या मंदिरचे यश

एमपीसी न्यूज- डाॅ. श.वा.परांजपे स्मृती बालनाट्य स्पर्धेत सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विभागातील 1 ली ते 4 थी या गटात ‘गाणारा मुलूख’ या बालनाट्यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सोनल शेटे यांना दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. संस्कार धावणे यास लक्षवेधी बालकलाकार तर पुष्कराज जोशी यास अभिनयामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

या बालनाट्यासाठी नितीन येडे, अस्मिता ढावरे यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापिका विद्या अडसुळे यांनी मार्गदर्शन केले.तसेच सरस्वती शिक्षण संस्थेच्या बालवाडी विभागात विद्या महामंडळ संस्थेचे शारदा बालक विहार तर्फे आयोजित केलेली बालअभिनय गीतगायन स्पर्धेत वसुधा बोकिल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

या सर्व विद्यार्थी, शिक्षकांचे मुख्याध्यापिका विद्या अडसुळे, बालवाडी विभाग प्रमुख सोनाली काशिद संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड,प्राथमिक विभाग प्रमुख ज्योती चोळकर आणि इतर संस्था पदाधिका-यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.