Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयातील रोजगार मेळाव्यात 98 विद्यार्थ्यांची निवड

एमपीसी न्युज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालय आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच रोजगार मेळावा संपन्न झाला. (Talegaon Dabhade) उद्योग, सेवा अशा अनेक क्षेत्रातील वीस नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या. रोजगार मेळाव्यासाठी एकूण 142 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी 98 विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे पार पडली.

उत्तम रोजगारासाठी सातत्याने कटिबद्ध असलेल्या इंद्रायणी महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थी रोजगार मेळाव्यात सहभागी झाले. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. काशिनाथ अडसूळ, बीबीए बीसीए विभागाच्या प्रमुख प्रा.विद्या भेगडे, मॅजिक बस या स्वयंसेवी संस्थेच्या टीम लिडर ज्योती वाकचौरे, शेखर सर, युनियन बँकेचे शारोन शहा, उन्मेष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Pune News : आरोपी पकडा आणि बक्षीस मिळवा ; पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अनोखी योजना

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आपल्या शुभेच्छापर संदेशात म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. जगाचा वेग वाढतो आहे, संधीची उपलब्धता आहे आणि आपला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचाही यात (Talegaon Dabhade) सहभाग असायला पाहिजे. म्हणून असे रोजगार मेळावे आयोजित करणे गरजेचे आहे. यावेळी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी अभिनंदन केले. प्रा के व्ही अडसुळ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.