Talegaon Dabhade : डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड इनोवेशनमध्ये विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र

डॉ. डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड इनोवेशन मध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी तज्ञांकडून विध्यार्थ्यानी उद्योगांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

डॉ. डी वाय पाटील कॉलेजे ऑफ इंजिनीरिंग अँड इनोवेशन वराळे, तळेगाव ता. मावळ मधील प्रथम वर्षाच्या विध्यार्थी व पालकांसाठी स्वागत समारंभ आणि प्रेरणादायक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी जाणल्या उद्योगांच्या अपेक्षा

यावेळी युनिव्हर्सल सॉफ्टस्किलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मिरचंदानी तसेच प्रशिक्षक प्रोफेसर महेश भोंग त्याचबरोबर हार्टफुलनेस क्लबचे अधिकारी संदीप मेहेरकर, इंडस एव्हिएशन सिस्टिम्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल जोशी उपस्थित होते.

सुनील मिरचंदानी यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, स्ट्रेस मॅनेजमेंट, लिडरशिप मॅनेजमेंट या संदर्भातील सखोल ज्ञान दिले. महेश भोंग यांनी औद्योगिक क्षेत्रातील अभियंताकडून असलेल्या अपेक्षा यावर प्रकाश टाकला. तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक कार्य यावर भर दिला.

संदीप मेहेरकर यांनी विद्यार्थी व पालकांना ध्यान धारणेचे महत्व समजावून सांगितले, सलग तीन दिवस विद्यार्थ्यांकडून ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून घेतले. अतुल जोशी यांनी प्रात्यक्षिके, कौशल्य विकसन या महत्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना, फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योगशीलता अंगी असणे किती महत्वाचे आहे याची जाणीव करून दिली.

डॉ. डी. वाय पाटील कॉलेजे ऑफ इंजिनीरिंग अँड इनोवेशनचे अध्यक्ष डॉ.सुशांत पाटील, सचिव अड सौ. अनुजा पाटील यांनी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्राचार्य डॉ. सुनील इंगोले, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्राध्यापक संकेत चिक्षे आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक मुकेश जाधव, पल्लवी कटके ,शीतल कवडे, प्रांजळ येलूरकर, अहिल्या नरसाळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.