Talegaon Dabhade : तळेगाव नगरपरिषद शाळेतील 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण समितीच्या शाळा क्रमांक 2 व 6 च्या इयत्ता 10 वी च्या मुलांचा निरोप समारंभ बुधवारी (दि. २७) पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षण समितीतर्फ़े रायटिंग पॅड व कंपास बॉक्स देण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सभापती कल्पना भोपळे, प्रशासन अधिकारी गावडे, दीपक बिचे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, शिक्षण समितीचे सदस्य नीता काळोखे, सुनील कारंडे, श्रीराम कुबेर, नगरसेवक रोहित लांघे उपस्थित होते. यावेळी दीपक बिचे, चित्रा जगनाडे, कल्पना भोपळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.