Talegaon Dabhade : सावली वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी लुटला ओ.पी. नय्यर यांच्या अवीट गाण्यांचा आनंद

एमपीसी न्यूज- तळेगावातील सावली वृद्धाश्रमाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त कलापिनीच्या तळेगावातील रसिकांसाठी मुंबई येथील मेघमल्हार वाद्य वृंदाचा “हिट्स ओ.पी.नय्यर” हा सुरेल कार्यक्रम आयोजित केला होता.

दीप्ती रेगे आणि एम दत्ता या दोन गायकांनी ‘आपके हसीन रुख पे आज नाय नूर है…..मेरा दिल मचल गया….,पुकारता चला हु मै….., बाबूजी धीरे चलना……ला, जरा होले होले चलो सजना……आखोही आखोमे इशारा होगया…………,मांग के साथ तुम्हारा….,उडे जब जब झुल्फे तेरी…….,यु तो हमने लाख हंसी देखे है….., ऐ दिल है मुश्कील जीना यहा……..दिवाना हुआ बादल…., इशारो इशारोमे दिल लेने वाले…….., ये देश है वीर जवानोंका……’ या सारखी ओ.पी.नय्यर यांची अनेक अवीट गाणी सादर करून रसिकांना ठेका धरायला लावला.

_MPC_DIR_MPU_II

या गाण्यांना तेवढीच सुरेल साथ मिलिंद परांजपे (सिंथ), स्वप्नील पंडीत (ताल वाद्य-तबला), मोहिते (अॅक्टोपॅड) यांनी केली आणि मंदार खराडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनाने आणि रसिकांची मने जिंकली.

सावली वृद्धाश्रमाच्या संचालिका चंदाताई आमडेकर त्यांचे पती अभय आमडेकर गेली कित्येक वर्षे दरवर्षी १ आणि २ जानेवारीला तळेगावकर रसिकांना उत्कृष्ठ कार्यकमाची भेट देत आहेत. यापूर्वी मंगेश पाडगावकर, मोहन जोशी, अरुण गुजराथी, विना वर्ल्डच्या वीणाताई पाटील यांच्या मुलाखती, गाण्यांचे अवीट कार्यक्रम, द्वारकानाथ संझगिरी यांचे शम्मीकपूर, देवानंद ,गुरुदत्त यांच्या दृक्श्राव्य कारकीर्दीचा आढावा असे अनेक उत्तोमोत्तम कार्यकम सादर झाले आहेत.

कलापिनीचे श्रीशैल गद्रे, विश्वास देशपांडे व तळेगावचे स्वास्थ्य गुरु अशोक बकरे व सावली वृद्धाश्रमाचे संचालक चंदाताई आमडेकर व अभय आमडेकर कार्यक्रमासाठी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.