Talegaon Dabhade News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत किरवे यांचं निधन

श्री संताजी जगनाडे महाराज तेली संस्था (सुदुंबरे) येथे चिटणीस म्हणून 15 वर्षे काम पाहिले. अनेक सामाजिक संस्थामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शशिकांत रामचंद्र किरवे यांचे दि. 1 सप्टेंबर रोजी अल्प आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा, नातू, सून, दोन मुली व जावई असा परिवार आहे.

अनेक वर्षे ते तेली समाज तळेगाव शहराचे अध्यक्ष होते. श्री संताजी जगनाडे महाराज तेली संस्था (सुदुंबरे) येथे चिटणीस म्हणून 15 वर्षे काम पाहिले. अनेक सामाजिक संस्थामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.

मावळचे आमदार सुनील शेळके यांचे सहकारी गोकुळ किरवे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.