
Talegaon Dabhade : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वीणा बेंजामिन यांचे निधन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वीणा शैलेंद्र (नाना) बेंजामिन (वय 73) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.


त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ख्रिश्चन समाज सेवा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश बेंजामिन व उद्योजक जयेश बेंजामिन यांच्या त्या मातोश्री होत. अंत्यसंस्कार उद्या (गुरुवारी, दि 26 डिसेंबर) सकाळी अकरा वाजता मेथाडिस्ट चर्च तळेगाव दाभाडे (गाव) येथे होईल.
