Talegaon Dabhade: शाळा चौक यापुढे ओळखला जाणार ‘कै. गो. नी. दांडेकर चौक’ या नावाने!

Talegaon Dabhade: 'Shala Chowk' will be known from now on in the name of 'Late Go. Nee. Dandekar Chowk'! संपूर्ण महाराष्ट्रात तळेगावचा नावलौकिक उंचविणारे दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक गोपाळ नीळकंठ दांडेकर यांचे निवासस्थान या चौकालगत आहे.

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध शाळा चौकाचे नामकरण ज्येष्ठ साहित्यिक कै. गो. नी. दांडेकर चौक असे करण्यात आले. या फलकाचे अनावरण माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे हस्ते करण्यात आले. 

यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, तळेगाव दाभाडे साहित्य संस्कृती मंडळाचे संस्थापक अ‍ॅड. सहदेव मखामले, तळेगाव दाभाडे शहर भाजपा अध्यक्ष रवींद्र माने, नगरसेविका मंगल जाधव, शोभा भेगडे, सतीश राऊत, रजनी ठाकूर, माजी नगरसेवक सचिन टकले, विनायक भेगडे, सागर शहा आदी उपस्थित होते.

 या चौकामध्ये जीवन शिक्षण मंडळ नावाची पहिली ते सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा होती. या शाळेमध्ये तळेगावातील आज 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व मंडळींनी  शिक्षण घेतले आहे. व आपले तालुका, राज्य, व गाव पातळीवर विविध क्षेत्रामध्ये नाव रोषण केले आहे. त्यामुळे या चौकास शाळा चौक असे नाव होते. या शाळेच्या ठिकाणी नगर परिषदेने व्यापारी संकुल उभारले व इतर ठिकाणी शिक्षणाची सोय झाल्याने ही शाळा लोप पावली.

या चौकालगत दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक गोपाळ नीलकंठ दांडेकर (आप्पा) यांचे निवासस्थान आहे. त्यांचे लहानपण याच चौकात गेले. त्यांनी आपल्या लेखनाचे विविध पैलू समाजापुढे आणले.  व त्यामुळे तळेगावच्या नावलौकिकात एक चांगली भर पडली. त्यामुळे नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या चौकास ‘कै. गो. नी. दांडेकर चौक’ असे नाव देण्याचा कार्यक्रम पार पाडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.