BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : शरद पवार यांची उद्या तळेगाव दाभाडेत सभा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे कवाडे, गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या (गुरुवारी)जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.

तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात गुरुवारी सकाळी 10 वाजता सभा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रमेश साळवे, माजी मंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, ज्येष्ठ नेते पै चंद्रकांत सातकर, शेकापचे तालुकाध्यक्ष माऊली नलावडे,एस आर पी चे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे कवाडे, गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी महाआघाडीचे कार्यकर्ते, सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन, महाआघाडीतर्फे करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.