BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : शरद पवार यांची उद्या तळेगाव येथे जाहीर सभा

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या, शुक्रवारी (दि.11) तळेगाव येथे जाहीर सभा होणार आहे थोर समाजसेवक नथूभाऊ भेगडे प्राथमिक शाळा, मारुती मंदिर चौक येथे संध्याकाळी 4 वाजता ही सभा होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे व काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी दिली.

या सभेला माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, चंद्रकांत सातकर, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, अध्यक्ष एसआरपी रमेश साळवे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, अध्यक्ष एसआरपी मावळ बाळासाहेब गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like