Talegaon Dabhade : महिला दिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत शारदा हेंद्रे प्रथम

एमपीसी न्यूज – महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार ( दि 4) तळेगाव येथील लायन्स क्लब हाॅलमध्ये तळेगाव दाभाडे नगरपरिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने महिलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आली. हरभरा डाळीपासून बनविलेला एक तिकट पदार्थ व तांदुळापासून बनविलेला गोड पदार्थ असे दोन विषय पाककला स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते.

यामध्ये महिलांनी मोठया संख्येने भाग घेतला, गोड आणि तिखट अशा दोन पदार्थांची ही स्पर्धा होती यामध्ये गोड पदार्थाचे तीन व तिखट पदार्थाचे अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात आले. अशी एकूण मिळून सहा क्रमांक काढण्यात आले.

गोड पदार्थाच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शारदा हेंद्रे, द्वितीय रश्मी राजे, तृतीय नीलम भालेराव तर, तिखट पदार्थांमध्ये प्रथम वृषाली चव्हाण, द्वितीय सुकन्या टकले तर, तृतीय क्रमांक शुभदा सोनपावले यांनी पटकावला. स्पर्धेचे परीक्षण श्री मिलिंद देखणे व डाएटीशीयन श्रुती देशपांडे यांनी केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्राताई जगनाडे यांचा सत्कार महिला बालकल्याण समिती सभापती काजल गटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेविका शोभा भेगडे, मंगला जाधव, विभावरी दाभाडे, नीता काळोखे, प्राची हेंद्रे तसेच भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी अलका भास्कर, रजनी ठाकूर, तनुजा दाभाडे उपस्थित होत्या.

महिला बालकल्याण समितीच्या सदस्या अनिता पवार व संध्या भेगडे यांच्या हस्ते उपस्थित नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला. आणि मान्यवर उपस्थितांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी महिलांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

परिक्षक मिलिंद देखणे व श्रृती देशपांडे या दोन्ही परीक्षकांनी मनोगतात सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन सभापती सौ काजल गटे,उपसभापती सौ कल्पना भोपळे व अधिकारी मनीषा चव्हाण यांनी केले.स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस एक भेटवस्तू देण्यात आली.

प्रास्ताविक महिला बालकल्याण समिती सभापती कल्पना भोपळे यांनी केले. आभार नगरसेविका संध्या भेगडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.