Talegaon-Dabhade : शिवशाही परिवार आयोजित शिवचरित्र पारायण सोहळ्याची सांगता

एमपीसी न्यूज : तळेगाव-दाभाडे येथील शिवशाही परिवाराच्या वतीने शिवचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले. शिवचरित्र पारायणाची सांगता नुकतीच झाली.(Talegaon-Dabhade) सात दिवस झालेल्या या पारायणामध्ये नवीन पिढी राष्ट्रप्रेमी व कर्तुत्ववान घडावी हा उद्देश होता. अनेकांनी सहपरिवार उपस्थित राहून शिवचरित्र समजावून घेतले.

नवरात्री उत्सवानिमित्ते या वर्षीपासून आपली नवी पिढी राष्ट्रप्रेमी व कर्तृत्ववान घडावी या एकमेव व प्रामाणिक उद्देशाने शिवशाही परिवार, तळेगाव दाभाडे तर्फे शिवचरित्राचे सात दिवस पारायण करण्यात आले. बहुसंख्य लोकांनी परिवाराच्यासहित हे पारायण रोज श्रवण केले. शिवचरित्रातून आजच्या काळाची राष्ट्रासमोरील आव्हाने व त्यास तोंड कसे द्यावे हे लोकांनी समाजाऊन घेतले. तसेच आपल्या लहान मुलांना आपल्या स्वतंत्र भारताचे खरे नायक कोण आणी यापुढे आदर्श कुणाचा ठेवावा याचा परिचय देखील झाला.

दररोज संध्याकाळी 04:30 ते 05:30 या वेळेत हे पारायण डॉ. प्रमोद बोराडे यांच्या निवासस्थानी संपन्न झाले. 2 ऑक्टोबर 2022 रोजी सांगता समारंभात बहुसंख्य लोक उपस्थित होते.(Talegaon-Dabhade) या प्रसंगी इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे मनोगतात म्हणाले,”शिवशाहीच्या पारायणातुन उत्पन्न होईल “ध्यास इतिहासातून सुवर्ण भारताचा…” आणि त्यातून भारत प्रचंड समृद्ध होईल”

Lumpy vaccination : शहरातील 1800 जनावरांचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण

 

डॉ. प्रिया बोराडे म्हणाल्या,” प्रतीवर्षी चरित्र कथनाचा पायंडा पाडणे हे आमचे काम आहे. त्यात कसूर घडणार नाही. नवी पिढी कर्तृत्ववान हवी तर त्यासाठी शिवचरित्र हा पर्याय आहे.”(Talegaon-Dabhade) अशोक काळोखे म्हणाले,”हा अभिनव उपक्रम असून पुढील वर्षी माझ्या निवासी व अन्य काही मंडळींच्या निवासी हा उपक्रम करणार आहोत.”

महादेव वर्तले म्हणाले, “श्री. गणेश प्रतिष्ठान माध्यमातून जे काही शिवचरित्र विषयक करता येईल ते करण्याचा सर्वातोपरी प्रयत्न करणार.”गिरीश खेर म्हणाले,”आपल्या राष्ट्रासमोर  संकटे आहेत. आपल्याला याचा सामना करायचा असेल तर फक्त शिवचरित्र हा एकमेव पर्याय आहे.”

नंदकुमार शेलार म्हणाले,”यापुढे असे अनेक उपक्रम अपेक्षित आहेत. या अभिनव उपक्रमाचे स्वागत करतो आणी मावळ तालुक्याच्या अनेक शाळामध्ये असे उपक्रम आयोजित (Talegaon-Dabhade) करण्याचा संकल्प सोडतो” डॉ. प्रमोद बोराडे व डॉ. प्रिया बोराडे  यांनी सर्वांचे आभार मानले. प्रसाद घेऊन  शिवचरित्राचा जयघोष करून शिवचरित्र पारायणाची सांगता झाली…

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.