BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : टाकवे – वडेश्वर गटातून सुनील शेळके यांना मतांची आघाडी देणार- शोभाताई कदम

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना टाकवे – वडेश्वर गटातून मोठे मताधिक्य मिळवून देणार असा निर्धार जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम यांनी व्यक्त केला आहे.

टाकवे – वडेश्वर गटामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी प्रत्येक गावागावात निधी उपलब्ध करुन दिलेला आहे त्यामधे डांबरी रस्ते, सिमेंट कॉक्रेट रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप, नविन प्राथमिक आरोग्य केंद्र, समाजमंदिर, अंगणवाडी इमारत, स्मशानभूमी इमारत, नळ पाणी पुरवठा योजना अशी विविध विकासकामे झालेली आहेत. ही सर्व विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेली असल्यामुळे येथील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना टाकवे – वडेश्वर गटातून मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील सुनील शेळके यांना या गटामधून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास शोभाताई कदम यांनी व्यक्त केला आहे.

HB_POST_END_FTR-A2

.