Talegaon Dabhade : बनावट इंदुलेखा ऑइल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बनावट इंदुलेखा भृंगा आॅईल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तळेगाव दाभाडे पोलिसांनी तळेगाव बाजार रोडवरील मयूर मेगा मार्केट होलसेलर्स या दुकानात केली.

मयूर रमेश ओसवाल (वय 35, रा. तळेगाव दाभाडे) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अखीलेश मुख्यानाथ पांडे (वय 45, रा. बांद्रा पूर्व, मुंबई) यांनी तळेगाव दाभाडे पोलिसात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर यांचे तळेगाव दाभाडे येथे बाजार रोडवर मयूर मेगा मार्केट होलसेलर्स हे दुकान आहे. या दुकानात त्यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीच्या नावाने बनावट इंदुलेखा भृंगा आॅईल विक्रीसाठी ठेवले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी मयूर याच्यावर कारवाई केली. त्याच्याविरोधात कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like