Talegaon Dabhade : सिद्देश भिंताडे वुशू क्रीडाप्रकारात प्रथम

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेमध्ये कृष्णराव भेगडे स्कूलचा सिद्धेश भिंताडे प्रथम व तेजस दाभाडे याने तृतीय क्रमांक पटकावला.

त्यात सिद्धेश याची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याला पुढील स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे व इतर सभासद, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like