Talegaon Dabhade : सर सलामत तो पगडी पचास; इंद्रायणीच्या रासेयो तर्फे हेल्मेट जनजागृती करत राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने नागरिकांमध्ये हेल्मेट जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (Talegaon Dabhade) होते. विविध घोषणा आणि गुलाब पुष्पे देऊन नागरिकांना हेल्मेट वापराविषयीचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. डोक्याचे महत्त्व विशद करत इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला.

यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ संभाजी मलघे, रासेयोच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.  दिप्ती पेठे व प्रा. डी पी काकडे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रूपकमल भोसले, प्रा. अर्चना काळे व स्वयंसेवक विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chinchwad : महिला दिनानिमित्त चिंचवडला चारचौघींशी दिलखुलास गप्पा, दिशा फाऊंडेशनचा उपक्रम

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की, जीवन अनमोल आहे. कुठलीही वेळ सांगून येत नाही. आज वाहतुकीचा प्रचंड ताण रस्त्यावर येत आहे. यामुळे जगणे असुरक्षित झाले आहे. याबाबतची खबरदारी म्हणून वाहन चालविताना हेल्मेट वापरणे गरजेचे असल्याचे डाॅ मलघे यांनी (Talegaon Dabhade) सांगितले.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे यांनी ह्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.