-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon Dabhade : निगडेतील दोन आदिवासी वस्त्यांमध्ये लावले सौरदिवे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – निगडे गावात हँड इन हँड इंडिया आणि इन्फ्रासॉफ्ट टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दोन आदिवासी वस्त्यांमध्ये आज (18 डिसें) एकूण सात सौरदिवे बसविण्यात आले होते. याचा उदघाटन कार्यक्रम नुकताच पार पडला.

सुरुवातीला वीज पुरवठा उपलब्ध नसणाऱ्या आदिवासी कुटुंबांची पहाणी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही आदिवासी वस्तीवर आवश्यक ठिकाणी एकूण सात सौरदिवे बसवण्यात आले.

सविता भांगरे- सरपंच, सोपान ठाकर- माजी सरपंच, मनीषा ठाकर आणि दत्ता ठाकर – ग्रा.पंचयात सदस्य यांच्या हस्ते सौर दिव्यांचे उदघाटन करण्यात आले. आदिवासी कुटुंबांना सौर दिव्यांमुळे प्रकाश मिळणार असल्याने आणि रात्रीच्या वेळी पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित वाटत असल्याने वस्तीवरील लोकांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमासाठी हँड इन हँड इंडियाकडून अनिल पिसाळ, विनोद नागटिळक, नीलम करवंदे हे प्रतिनिधी उपस्थित होते. हँड इन हँड इंडियाच्या मंथन भांगरे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी निगडे गावातील ग्रामस्थही उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.