Talegaon Dabhade : इनरव्हील हॉलला सोलरची ‘पॉवर’

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade) स्टेशन विभागात असलेल्या इनरव्हील हॉलला अध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्या प्रयत्नातून सोलर युनिट बसविण्यात आले. या युनिटचे उद्घाटन डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांच्या हस्ते करण्यात आले. नव्याने बसवलेल्या या सोलर युनिटमुळे येथील सर्व विद्युत कनेक्शन हे सोलर निर्मित ऊर्जेवर चालणार आहेत.

या प्रसंगी अध्यक्षा वैशाली दाभाडे, पी पी हेमलता खळदे, निशा पवार, संध्या थोरात, अनुप्रिया खाडे, अर्चना देशमुख, अल्पना हुंडारे, जयश्री दाभाडे, उज्वला बागवे व सदस्य उपस्थित होते.

सगळीकडे विकास होत असताना, आजही वीज निर्मितीसाठी कोळशाचा (Talegaon Dabhade) वापर होतो. ज्यामुळे प्रदुषणात वाढ होते. सोलरमुळे निर्माण झालेल्या वीजेमुळे आपण काही अंशी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असे अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

Pune Police : लोहमार्ग पोलीस शिपाई पदाच्या भरतीच्या अर्जासाठी मुदतवाढ

नव्याने बसवलेल्या या सोलर युनिट मुळे येथील सर्व विद्युत कनेक्शन हे सोलरवर निर्मित ऊर्जेवर चालणाऱ आहेत. यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचे तसेच महावितरण तळेगाव दाभाडे यांचे क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी विशेष आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.