Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या हळदी- कुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हळदी- कुंकू समारंभास महिलांनी उत्स्फूर्त (Talegaon Dabhade) प्रतिसाद नोंदवला. या समारंभात 4 हजार 750 महिला उपस्थित होत्या. यावेळी पतसंस्थेचे आधारस्तंभ पुणे महानगर नियोजन समितीचे विद्यमान सदस्य तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे विद्यमान नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांनी, आपआपसातील कलह विसरून प्रेमभाव वाढविण्याचे आवाहन करत तिळगुळाचे वाटप केले.

Pimpri News : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये ‘प्रजासत्ताक दिन’उत्साहात साजरा 

याप्रसंगी शहर व परिसरातील माता भगिनी मोठ्या संस्थेने उपस्थित होत्या, संस्थेच्या वतीने नूतन भेगडे, श्वेता भोंगाडे, मनीषा पारगे, मेघा भेगडे, संध्या देसाई,आरती राऊत, प्रियंका भेगडे,रंजना आंबेकर शीतल पवार, प्रतीक्षा भेगडे, स्वाती वि भेगडे तस्लिम सिकिलकर,उषा भेगडे, मनीषा कणसे,सुलभा काळोखे तसेच सर्व तळेगावमधील पतसंस्थांच्या महिला पदाधिकारी, शहरातील आजी-माजी नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी संतोष भेगडे पुढे म्हणाले की, महिला भगिनी यांचे या निमित्ताने संघटन व्हावे, एकोपा वाढावा व संस्कृतीचे संवर्धन व्हावे, हा उदात्त हेतू मानून,या निमित्ताने कौटुंबिक संस्कृतीचे दर्शन दिले.स्त्रियांचे कुंकू हे (Talegaon Dabhade)  सौभाग्य प्रतीक मानल्यामुळे शुभकार्यात त्याचा वापर करतात .  सामाजिक ऐक्यासाठी हळदी-कुंकू हे एक भगिनींसाठी स्नेह मिळण्याचे प्रतीक आहे. आपआपसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी यावेळी तिळगुळाचेही वाटप करण्यात आले.

सर्व माता भगिनींचे उपस्थितीबद्दल आभार संस्थेचे अध्यक्ष राहुल पंढरीनाथ पारगे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.