मंगळवार, नोव्हेंबर 29, 2022

Talegaon Dabhade : इनर व्हील क्लबच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव दाभाडे इनर व्हील क्लबने भुषविले यजमानपद

एमपीसी न्यूज : इनरव्हील क्लबच्या (Talegaon Dabhade) डिस्ट्रिक्ट 313 चा वार्षिक रॅलीचा कार्यक्रम तळेगाव दाभाडे जवळील भंडारा लाॅन्स येथे उत्साहात पार पडला. तळेगाव दाभाडे इनरव्हील क्लबने या उत्स्फूर्त कार्यक्रमाचे यजमानपद भुषविले. डिस्ट्रिक्ट 313  मधील जालना, औरंगाबाद, उदगीर, क-हाड, महाबळेश्वर, सातारा, पेण, खोपोली, पुणे अशा 70 पेक्षा जास्त क्लबने यात सहभाग नोंदवला. इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेने रौप्य महोत्सवी वर्षात केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे यांनी अध्यक्षा वैशाली दाभाडे व रॅली समन्वयक प्रवीण साठे यांचे विशेष कौतुक केले.

रविवार (दि 20) रोजी भंडारा लाॅन्स मधील बँक्वेट हाॅलमध्ये या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीच्या या विविध स्पर्धांमध्ये शंभरपेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धांमध्ये 70 ते 75 वयोगटातील महिलांनी देखील नृत्य स्पर्धेत भाग घेऊन रंगत आणली. यामध्ये क्लासिकल डान्स, झुंबा डान्स, हास्य जत्रा स्कीट, ‘इनरव्हील क्वीन’ असे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मानसी दांडेकर यांनी गणेश वंदना सादर करून स्पर्धेला सुरुवात झाली.

Pune : आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी मागासवर्गीय कल्याण निधीचा योग्य वापर करा – डॉ. सिद्धार्थ धेंडे

या प्रत्येक स्पर्धेत प्रत्येकी तीन क्रमांकांचे व 4 थे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. इनरव्हील क्वीन हा किताब खोपोली इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सारिका धोत्रे तसेच पुणे इम्पीरियल क्लबच्या अध्यक्षा शोभा श्रीकांत यांच्यात विभागून देण्यात आला. बक्षीस समारंभ डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे, सेक्रेटरी लता शिवशंकर, ट्रेशरर अनुराधा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला.

डिस्ट्रिक्टच्या सर्व पीडीसी व सदस्यांचा सत्कार तळेगाव (Talegaon Dabhade) क्लबच्या माजी अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला, तसेच लकी ड्रॉचे बक्षीस वितरण सर्व डिस्ट्रिक्टच्या पीडीसींच्या हस्ते करण्यात आले. डाॅ. दीपाली झंवर (भंडारी) यांनी केलेल्या सुत्रसंचालनाचा व अर्चना देशमुख, निशा पवार, दीपाली चव्हाण, अर्चना चितळे, शर्मिला शाह, भारती शाह, अल्पना हुंडारे, डॉ. लता पुणे आणि मुग्धा जोर्वेकर यांनी केलेल्या स्टेज व्यवस्थापनामुळे कार्यक्रम वेगळाच उठावदार झाला.

स्वागत व प्रास्ताविक इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशालीताई दाभाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सोनिगरा ज्वेलर्स, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा साधना शहा, हेमलता खळदे, शुभांगी कार्ले, अर्चना देशमुख, मीना आगरवाल, रोटरी सिटीचे माजी अध्यक्ष विलास काळोखे, दादासाहेब उ-हे व अतुल शहा यांचे सहकार्य लाभले.

मिरा बेडेकर, संगीता जाधव, भावना चव्हाण, पल्लवी बीचे, अल्भा पारेख, ज्योती चोळकर, निता काळोखे, मंगल पवार, सुनीता काळोखे, वैशाली जामखेडकर, रेणुका जाधव, साधना काळोखे, वैशाली खळदे, जयश्री दाभाडे, ममता मराठे तसेच सर्व माजी अध्यक्ष व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचा समारोप तळेगाव दाभाडे इनरव्हील क्लबच्या आजी माजी अध्यक्षांच्या धडाकेबाज नृत्याने झाला.

Latest news
Related news