Talegaon Dabhade : जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद; सलग दोन दिवस शहरात कडकडीत बंद

एमपीसी न्यूज :  कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी तळेगाव शहरात पुकारण्यात आलेल्या तीन दिवसांच्या बंदच्या   निर्णयाला तळेगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात गुरूवारी (दि 16) व शुक्रवारी (दि 17) कडकडीत बंद पाळण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, शहर समन्वय समिती, किराणा असोशिएशन आणि भाजीपाला व्यापारी यांच्या सहमतीने तळेगाव दाभाडे शहर परिसरात दि. १६, १७ व १८ एप्रिल रोजी (गुरुवार ते शनिवार) तळेगाव शहर पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शहरात गुरूवारी (दि 16) व शुक्रवारी (दि 17) या बंद कालावधीमध्ये सकाळी दूग्ध व्यावसयिक तसेच दवाखाने व मेडिकलची दुकाने पूर्णवेळ चालू ठेवण्यात आली होती. तळेगाव दाभाडे गावभागात लिंबफाटा ते जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन अशी एकेरी वाहतूक करण्यात आली.

संभाजी नगर, कडोलकर कॉलनी, मारुती मंदिर चौकातून बाजार पेठेकडे, भाजपा कार्यालय समोरील रस्ता तसेच तळेगाव स्टेशन येथील एमएसइबीकडे जाणारा रस्ता वाहतुकीला पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.