Talegaon Dabhade : खांडगे स्कूलमध्ये क्रीडास्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रीडास्पर्धा उत्साहात पार पडल्या. विजयाचे प्रतीक असलेल्या मशालीच्या प्रज्वलनाने क्रिडा स्पर्धांची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायतींचे सादरीकरण केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणाली गुरव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. खो खो, फुटबॉल, अडथळा शर्यत, धावणे, बटाटा शर्यत अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना व संघांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका वशिष्ट यांनी केले तर संयोजन युनूस पटेल व इतर शिक्षकवर्गाने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.