Talegaon Dabhade: नगरपरिषदेकडून ‘कोरोना’चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जंतुनाशकांची फवारणी

0

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून जंतुनाशकांची फवारणी आणि रस्ते धुऊन काढण्यात आले. तर नगरपरिषद प्रशासकीय कामकाजात फक्त 5 टक्के कर्मचारीच पुढील आदेश मिळेपर्यंत कामावर येतील, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी दिली.

तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, राजेंद्र चौक, गणपती चौक, शाळा चौक, बाजार पेठेतील प्रमुख रस्ते तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अग्निशमन बंबामधील पाण्यात जंतुनाशके टाकून त्यांची सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. तसेच इतर भागात जंतुनाशक पावडर टाकून धुरळणी करण्यात आली.

यावेळी पाहणी करण्यासाठी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, सभागृहनेते अमोल शेटे, नगरसेवक अरुण भेगडे पाटील, शोभा भेगडे, आशुतोष हेंद्रे, सचिन जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर सह व्यापारी वर्ग उपस्थित होता.

शासनाच्या आदेशान्वये नगरपरिषदेतील अत्यावश्यक सेवेतील कामगारांना वगळून इतर कर्मचा-यांमधून गरजेपुरते कर्मचारी ठेऊन बाकी कर्मचा-यांना सुट्टी देण्यात आली.

विलगीकरणासाठी समाविष्ट नागरिकांची संख्या 40 पर्यंत
तळेगाव परिसरात 40 नागरिकांना विलगीकरणाव्दारे आपापल्या घरामध्येच थांबावयास सांगितले असून यामध्ये कोणीही पाॅझिटीव्ह नाही. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिली.

बेशिस्त नागरिकांना पोलिसाकडून चोप…..
शासनाने १४४ कलमाव्दारे जमावबंदीचा आदेश दिला आहे. परंतु काही सडक लहरी याकडे दुर्लक्ष करून बेजबाबदारपणे गाड्या चालविणे, घोळका करून गप्पा मारणे व नियमाचे उल्लंघन करण्या-यांना पोलिसांनी चौका चौकात चांगला चोप दिला. तसेच आज चवथ्या दिवशीही तळेगावात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता.

HB_POST_END_FTR-A2
You might also like