Talegaon Dabhade : एसएससीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

एमपीसी न्यूज- आजपासून राज्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मावळ तालुका शिक्षकेतर संघटना व नवीन समर्थ विद्यालय शालेय समितीच्या वतीने एस एस सी परीक्षेसाठी नवीन समर्थ विद्यालय या उप केंद्रातील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणि परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा, मावळ तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष संजय कसाबी, शाळेचे मुख्याध्यापक कैलास पारधी, पर्यवेक्षक बाबाराव अंभोरे, पांडुरंग पोटे, सुदाम वाळुंज, रेवाप्पा शितोळे, गंगाराम खंडागळे, दत्तात्रय ठाकर व विद्यालयातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

राज्यभरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली. मावळातील 11 केंद्रावर परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली असून या अकरा केंद्रावर एकूण सहा हजार सहाशे 42 विद्यार्थी परीक्षा देत असून तळेगाव दाभाडे केंद्रावर पु वा परांजपे शाळेत 740 विद्यार्थी व रामभाऊ परूळेकर विद्यालयामध्ये 778 विद्यार्थी असे एकूण 1518 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. अशी माहिती मावळ मुख्य परीक्षक व मावळ गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ व उपपरीक्षक सहदेव डोंबे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.