Talegaon Dabhade : शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या एसटीला अपघात; 15 विद्यार्थी 3 शिक्षक जखमी

एमपीसी न्यूज- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर तळेगाव खिंडीत आज, बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या एसटी बसने महामार्गावर बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक दिली. या अपघातात 45 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी आणि तीन शिक्षक जखमी झाले आहेत. ही एसटी मुंबईहून संगमनेरकडे निघाली होती. या अपघातातील जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची माहिती अशी की, खताळ महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांची अलिबागला सहल गेली होती. सहलीहून परत संगमनेरला जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेनंतर उसाच्या मोळ्या महामार्गावर आल्या तर एसटीही बंद पडल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.

_MPC_DIR_MPU_II

सध्या पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने वाहतूक वळविण्यात आली आहे. दरम्यान अशा पद्धतीनं ट्रॉली महामार्गावर बंद पडली असल्याची पूर्व कल्पना कोणाला देण्यात आली नव्हती का असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबई-पुणे महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे धोकायदयक बनत चालला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.