Talegaon Dabhade: पावसाळ्यापुर्वीची कामे सुरु करा – गणेश काकडे

एमपीसी न्यूज – पावसाळा काही दिवसांवर आला आहे. पावसाळ्यात तळेगावकरांना कोणताही त्रास होऊ नये. यासाठी नगरपरिषदेने तत्काळ पावसाळ्यापुर्वीच्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात करावी,  अशी सूचना विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी केली आहे.

याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात   काकडे यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मागील दीड महिन्यापासून देशभरात लॉकडाउन आहे. तिस-या लॉकडाउनला आजपासून सुरुवात झाली आहे. यामुळे नगरपरिषदेचे कामकाज ठप्प आहे. सुदैवाने तळेगाव दाभाडे शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहराची परिस्थिती चिंताजनक नाही.

पावसाळा  काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाची कोणतीही पुर्वतयारी दिसत नाही.  मागील वर्षी लोकार्पण झालेला हिंदमाता भुयारी मार्गाच्या नाल्याचे काम प्रलंबित आहे. तसचे संपुर्ण शहरातील नालेसफाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी तत्काळ नालेसाफईाच्या कामाला सुरुवात करावी.

याशिवाय अनेक विकास कामांच्या निविदा, कार्यरंभ आदेश (वर्क ऑर्डर) स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेअभावी प्रलंबित आहेत. या प्रलंबित कामांचा विचार करता सर्वपक्षीय गटनेत्यांना विश्वासात घ्यावे. नगराध्यक्षांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सभा घ्यावी. अथवा नगराध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांमध्ये कलम 58 ची कायदेशीर पडताळणी करुन अंमलबजावणी करावी अशी सूचनाही विरोधी पक्षनेते काकडे यांनी केली आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.