Talegaon Dabhade : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभाग (Talegaon Dabhade) पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत 87 लाख 89 हजार 520 रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण 1 कोटी 5 लक्ष 7 हजार 520 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर, हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा रचून गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीच्या ट्रक क्र.एम एच 46 एफ – 6138 या क्रमांकाचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली.

Sawai Gandharva : सवाई गंधर्व महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर

या ट्रकमध्ये रिअल व्हिस्की 750 मि.लीचे 4 हजार 164 सीलबंद बाटल्या (Talegaon Dabhade) व रिअल व्हिस्की 180 मि.लीचे 5 हजार 760 सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की 750 मिलीचे 9 हजार 600 सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण 1 हजार 267 खोके जप्त करण्यात आले. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत 1 कोटी 5 लक्ष 7 हजार 520 रुपये इतकी आहे. वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय 24 वर्षे, रा. मु.पो. तांबोळे, ता. मोहोळ) व देविदास विकास भोसले (वय 29, वर्षे रा. मु.पो. खवणी, मोहोळ जि. सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.