Talegaon Dabhade : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या वतीने पंढरपुरला पायी जाणाऱ्या दिंड्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य,कामगार,पर्यावरण व पुनर्वसन राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या परिवाराच्या वतीने अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि श्री पोटोबा देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील पंढरपुरला पायी जाणाऱ्या दिंड्यांना ताडपत्री देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते .ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, धार्मिक स्थळे ही आजच्या तरुणाईच्या दृष्टीकोणातून संस्कार केंद्रे म्हणून संबोधली गेली पाहिजे. तरुण वर्गाने हा वारकरी संप्रदायाचा वसा पुढे चालु ठेवून आपला परिवार सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

  • यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, सुखदेव ठाकर, दत्तात्रय शिंदे, गणेशअप्पा ढोरे यांनी देखील मनोगते व्यक्त केली.

यावेळी उपस्थितांमध्ये नामदार भेगडे यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई भेगडे, सौभाग्यवती सौ सारिका भेगडे प्रशांत ढोरे,माऊली शिंदे,रोहिदास महाराज हांडे,भास्करराव म्हाळसकर, नितीनमहाराज काकडे,नरहरी केदारी, सभापती सुवर्णा कुंभार,उपसभापती जिजाबाई पोटफोडे,माजी उपनगराध्यक्ष सुनिल शेळके, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर, आदींसह मान्यवर वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंता कुडे यांनी केले. सूत्रसंचालन गणेश जांभळे यांनी तर, आभार किरण भिलारे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.