Talegaon Dabhade : नगरपरिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद विद्यालय क्र 6 येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, घोषवाक्य स्पर्धा अआयोजित करण्यात आल्या होत्या.

यावेळी भारतीय संविधान प्रत विद्यार्थ्यानी हाताळली व सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अमोल पाटील यानी मनोगतात संविधानाचे महत्व व प्रस्ताविकामधील शब्दांचे अर्थ समजावून सांगितले.

प्रियांका हातेकर, वसुंधरा माळवदकर, प्रतिभा काळे, दीपमाला गायकवाड, आशा खुणे आदिनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.