Talegaon Dabhade : विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासूनच इंग्रजीत सक्षम करावे लागणार -डाॅ.सुनील कुऱ्हाडे

एमपीसी न्यूज – शिक्षणाबरोबरच लोकसहभागातून समाजसेवेचे कार्य जिल्हा परिषदेचे शिक्षक करतात. मराठी मातृभाषा आहे. मात्र, इंग्रजी ज्ञानभाषा असल्याने प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांना इंग्रजीत सक्षम करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षेचा दबाव नाही. मात्र, विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही. याबाबतीत पालकांच्या गैरसमजातून शिक्षकांची दमछाक होते आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ.सुनील कुऱ्हाडे यांनी केले.

श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वामी विवेकानंद शिक्षक गौरव पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हा समारंभ येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलमधील मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहात शनिवारी (दि.२१) उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार कृष्णराव भेगडे होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.अशोक शिंदे, स्नेहवर्धक शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे,मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव यादवेंद्र खळदे, संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब उ-हे, कार्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव मिलींद शेलार, कैलास काळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी तेजस्विनी सरोदे (पूर्वप्राथमिक), प्रभा काळे (प्राथमिक), सागर केंजूर(माध्यमिक), अनुजा धस(स्थानिक रहिवासी प्राथमिक), हनुमंत बारबोले (स्थानिक रहिवासी माध्यमिक), उत्तम मांडे(मुख्याध्यापक), सीमा गावडे (सेवानिवृत्त) यांना कृष्णराव भेगडे व डॉ. डाॅ.सुनील कुऱ्हाडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वामी विवेकानंद शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संस्थेचे संचालक रामराव जगदाळे,मिलींद शेलार, प्रा.दीपक बिचे, कुसुम वाळुंज , लक्ष्मण मखर आणि विलास भेगडे यांचाही शिक्षक दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सुदाम दाभाडे,शालेय समितीच्या अध्यक्षा रजनीगंधा खांडगे,माजी नगरसेवक तथा संचालक श्रीराम कुबेर, सुमती निलवे, दशरथ जांभुळकर, महेशभाई शाह, अनिल धर्माधिकारी यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृष्णराव भेगडे म्हणाले, समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा वाटा महत्वाचा आहे.शिक्षकांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आदराचा आहे.देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थी हा महत्वाचा घटक आहे. देशाचे उज्ज्वल भविष्य आणि होतकरू तरुण, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे काम शिक्षक करीत असल्याने ते आदरास पात्र आहेत.

प्रा.डॉ.अशोक शिंदे म्हणाले, शील सांभाळून क्षमता सिद्ध करायला लावते ते शिक्षण.डॉ.शिंदे यांच्या ‘होय मी आज शिवबा शोधतोय’असे पत्रात लिव्हा’या कवितेने उपस्थितांना चेतना दिली.

चंद्रकांत शेटे यांनी संतोष खांडगे आणि संस्था राबवित असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. सत्कारार्थींच्या वतीने प्रभा काळे, अनुजा धस यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष खांडगे यांनी केले. खांडगे यांनी प्रस्ताविकात दोन्ही संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कैलास काळे यांनी आभार मानले. सुचेता बिचे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like