Talegaon Dabhade: वराळे मावळ येथे तरूणाची आत्महत्या

Talegaon Dabhade: Suicide of a youth at Varale Maval दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता अक्षयने आत्महत्या केल्याचे आढळून आले.

एमपीसी न्यूज- वराळे मावळ येथे एका 24 वर्षीय तरूणाने घरात साडीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. अक्षय भानुदास कातळे (रा खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

याप्रकरणी भानुदास लक्ष्मण कातळे (वय 49 रा खराबवाडी, ता खेड, पुणे) यांनी तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा वराळे येथे एकटाच राहत असे. त्याला जेवणासाठी घरून डबा दिला जात होता. बुधवारी (दि.17) सकाळी नेहमीप्रमाणे त्याचे वडील डबा देण्यासाठी गेले असता दरवाजा बंद असल्याने दरवाजा वाजवला.

पण आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी फोन केला, परंतु, फोन न घेतल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता अक्षयने फॅनला साडी बांधून फाशी घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यांनी लगेचच पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता अक्षयने आत्महत्या केल्याचे आढळून आले. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like