Talegaon Dabhade : कार्यकर्त्यांच्या पंक्तीत बसून सुनीलआण्णा करतात जेवण

एमपीसी न्यूज – निवडणूक प्रचाराच्या काळात कार्यकर्त्यांबरोबर जमिनीवर बसून जेवण करणारे साधेसुधे सुनीलआण्णा शेळके कार्यकर्त्यांप्रमाणेच सर्वसामान्य मतदारांच्या मनात घर करीत आहेत.

मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके हे त्यांचा दानशूरपणा, कामाची धडाडी, विकासाचा दृष्टीकोन या बरोबरच त्यांच्या साधेपणाबद्दल चांगलेच चर्चेत आहेत.

निवडणूक प्रचाराच्या काळात गावोगाव फिरताना दुपारी आणि रात्री वेळ मिळेल तेव्हा सोबतच्या कार्यकर्त्यांबरोबर मांडीला मांडी लावून बसायचे आणि त्यांच्याशी हास्यविनोद करत दोन घास खायचे, हाच काय तो अण्णांचा ‘श्रमपरिहार’ आहे. अत्यंत कुशल संघटक असलेले सुनीलआण्णा त्यांच्या सोबतच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मोठ्या आस्थेने चौकशी करतात आणि काळजी घेतात.

लोणावळा येथे प्रचार करत असताना दुपारी गावठाण येथे प्रचार करुन आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी दुपारचे जेवण केले. माणूस साधा आणि जेवणाचा बेतही साधा! हा साधेपणाच सर्वसामान्य मतदारांना भावत आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते आण्णांच्या भोजनाची ‘खास’ वेगळी व्यवस्था करतात. पण, आण्णा त्यांना नम्रतापूर्वक नकार देतात. ‘माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांबरोबर जेवलो की दोन घास जास्त जातात’, हे आण्णा यांचे उत्तर समोरच्याला कायमचं जिंकून घेते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like