Talegaon Dabhade : सुनील भोंगाडे यांच्यातर्फे निगडेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉक

एमपीसी न्यूज- निगडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील प्रांगणामध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुनील (नाना) भोंगाडे यांनी स्वखर्चातून सुमारे दोन लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसवून दिले.

पेव्हर ब्लॉकचे उदघाटन सुनील भोंगाडे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सरपंच सविता बबूशा भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी निगडे गावचे आजी- माजी पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी सुनील भोंगाडे यांचे आभार मानले. प्रास्ताविक माजी उपसरपंच भिकाजी भागवत यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य गणेश मारुती भांगरे व शिंदे सर यांनी केले तर साहेबराव देशमुख यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.